सांगा पाहू मी कोण? VSK बद्दल थोडे काही...

 




सांगा पाहू मी कोण?

माझ्या नावाचे पहिले अक्षर वेगवान प्रवास करणारे‌‌ आहे,

परंतु‌‌ हळूच,मंद‌ करणारे नाही.

माझ्या नावाचे दूसरे अक्षर दिगांबर , भगवान महादेव सारखे पवित्र आहे,

परंतु दानवाप्रमाणे अपवित्र नाही.

माझ्या नावाचे तिसरे अक्षर कामात व्यस्त राहणारे‌‌ आहे,

परंतु रिकामटेकडे नाही.

माझ्या नावाचे चौथे‌‌ अक्षर‌ प्रवाशांना मजून उमजून घेण्यासारखे आहे,

परंतु चिडचिडेपणा करणारे नाही.

माझ्या नावाचे पाचवे अक्षर चिरंतन तेवत राहणारे आहे,

परंतु विझणारे नाही.

माझ्या नावाचे सहावे अक्षर मस्कार करणारे, आशीर्वाद घेणारे आहे,

परंतु अशूभ, अमंगल नाही.

माझ्या नावाचे सातवे अक्षर खास इतरांची देखभाल‌ करणारे आहे,

परंतु असुरक्षित पणा देणारे नाही.

माझ्या नावाचे आठवे‌अक्षर मंगलमय,आनंदी‌‌ ठेवणारे आहे,

परंतु रडवणारे नाही.

माझ्या नावाचे नववे‌ अक्षर मळा सारखे फुलवणारे‌‌ आहे, परंतु काट्याप्रमाणे‌ टोचणारे‌ नाही,

माझ्या नावाचे दहावे‌अक्षर‌ णांगणात लढणारे आहे,

परंतु शांत बसणारे नाही.

सांगा पाहू मी कोण?

उत्तर -वेदिका सचिन‌ खामकर


🙏🏻🌸🙏🏻

Comments