#vsktoursandtravels_traveldiaries 

माझे आई बाबा गोवा येथे गेले होते जायच्या आधी त्यांनी एक रील बघितलं होत आजकाल सगळेच एखाद्या ठिकाणी जायच्या आधी तिथले व्हिडिओ, रील्स बघतात, माहिती घेतात मग जातात   , रील एका किल्ल्याबद्दल होतं किल्ल्याच नाव आहे बेतूल ! रील खूप छान  होतं , रील्स मध्ये त्यांनी अतिशय छान वर्णन केलं होतं त्या किल्ल्याचे वेगवेगळ्या अँगल्स नी शूट करून व्हिडिओ एडिटिंग करून अतिशय चांगल्या प्रकारे समजावलं होतं कि, तिथे कसा जायचं?, तिथे गेल्यावर काय दिसेल , कसा नजारा दिसेल , नदी आणि समुद्राचा संगम दिसतो अतिशय सुंदर नजर बेतूल किल्य्यावरुन दिसतो . गूगल वरून पत्ता मिळाला, गाडी घेऊन ड्राईव्ह करत सगळे तिथे पोहोचले, रस्त्यानी येणारे जाणाऱ्यांनी पण थोडी मदत केलीच , एक खूप मोठा चढ चढून गेल्यानंतर रील मध्ये दाखवलेल्या जागेवर ते पोहोचले , आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि जेवढी जागा रील  मध्ये दाखवली होती तेवढाच तो किल्ला आहे (शिल्लक !) बाकी काहीही नाही !! " किल्ला " या शब्दाच्या अंतर्गत आपल्या डोळ्यांसमोर जे काही उभा राहतं त्यापैकी फक्त एक बुरुज दिसतो  बाकी  काहीही दिसत नाही ! घोर पचका !!! वेळ  , पेट्रोल , चढून जाण्याचे शारीरिक कष्ट , या सगळ्या गोष्टी वाया गेल्या.. !! तिथून दिसणाऱ्या निसर्गानी थोडी फुंकर घातली त्यांच्या निराशेवर पण रात्री पाय दाबायला तो निसर्ग येणार नव्हता ! तिथून दिसणारा निसर्ग मात्र जसा रील  मध्ये दाखवला होता तसाच होता , पण त्या बीच पर्यंत जाता येणार नव्हतं कारण समुद्र मध्ये होता .. तो क्रॉस करून जाणं शक्य नव्हतं ..! तिथे थोडा वेळ घालवून ते सगळे हॉटेल वर परत आले . आणि पुण्याला आल्यावर त्यांनी हा किस्सा मला सांगितला ... हसण्यात १० मिनीटे  घालवल्यावर मी देखील ते रील  बघितलं आणि शहाणी झाले. 

बऱ्याचवेळा रील्स बघून त्याठिकाणी फिरायला गेल्यावर ती जागा रील्स मध्ये जशी दिसते त्यापेक्षा खुप वेगळी असते किंवा ज्या पद्धतीने  रील्स मध्ये दाखवली गेली आहे त्यापेक्षा वेगळी  किंवा तेवढीच असते अशावेळेस आपण रील्स मध्ये बघितलेल्या जागा आधी गुगल  वर पाहाव्यात , चौकशी करावी , शक्य असेल तर आपण जेथे  राहायचे बुकिंग केले आहे हॉटेल किंवा होमी स्टे, तिथल्या लोकांना त्या जागेविषयी विचारून घ्यावे ती जागा आपल्या हॉटेल पासून किती लांब आहे ते पहावे , सरळ आपल्या आवडीच्या टूर ऑर्गनईजर ची मदत घ्यावी ते तुम्हाला त्या विषयी नक्की सांगू शकतात . उदाहरण द्याच झालं तर माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं त्यांना काश्मीर मधील छोट्या खेडेगावांमध्ये जायचं होत रील्स मध्ये सांगितल्यानुसार पण प्रत्यक्षात त्या जागा खूप लांब होत्या ८ तास प्रवास करून जावं लागणार होतं श्रीनगर पासून त्यांउळे त्यांचा सहलीचे दिवस आणि प्रवास खर्च देखील वाढत होता त्यातपण एका दिवसात जाऊन परत येण्यासारखी  ती ठिकाण नव्हती त्यामुळे राहण्याचा खर्च देखील वाढणार होता ते सगळं पटवून दिल्यावर त्यांना जसा श्रीनगर मध्ये त्यांना दिलेरला हॉटेल होत तसाच तिथे हवा होतं आम्हाला त्या सर्व सोयींनी युक्त हॉटेल त्या गावात सापडेना मग आहे तेच हॉटेल बुक करून त्यांनी ती सहल केली पण प्रवासाचा त्यांना खुप कंटाळा आला ,जागा दिसायला खूपच सुंदर होत्या पण रील्स  मध्ये सांगितल्यापेक्षा दुप्पट वेळ पोहोचायला लागला, पाऊस पण आला, आणि त्या जागांवर सोयिंचा प्रचंड अभाव होता  तर काही जागा अगदी जवळच होत्या तिथे गेल्यावर लक्षात आलो  नसतो आलॊ तरी चाललं  असतं .  इंस्टाग्राम वर काश्मीर विषयी खुप रील्स वायरल झालेले आहेत काश्मीर खरतर खुरूप सुंदर आहे स्वर्ग ! आणि फक्त बर्फाच्या सरसों मध्ये नाही बरका प्रत्येक ऋतू मध्ये एक वेगळा लुक असतो काश्मीर चा ! तेथील सौंदर्य प्रत्येक ऋतु मध्ये बदलतं  ... तुम्ही पाहिलेले बर्फाचे रील्स हे कोणत्या महिन्यात काढले गेले असेल याचा अंदाज बांधून तिथे त्यानुसार प्रवास करावा , कारण जानेवारी च्या रील्स मध्ये  बघितलेली जागा मार्च  महिन्यात पूर्णपणे वेगळी दिसते , डिसेंबर मध्ये दिसणारं काश्मीर आणि मार्च / ट्युलिप सिझन  मध्ये दिसणारं काश्मीर हे पूर्ण पणे वेगळं असतं तसेच काही रील्स मध्ये पुंच , राजुरी सारख्या काश्मीर मधल्या छोट्या खेडेगावातील काही जागा दाखवलेल्या आहेत ज्या खरंतर श्रीनगर शहरापासून खूप लांब आहेत , त्या जागा  सुंदर आहेत ,ऑफबिट  काश्मीर च्या टूर मध्ये त्या करता येतात, पण तिथे राहण्याच्या सोयी अतिशय कमी आहेत , जेवण किंवा सर्विस हि श्रीनगर एवढी डेव्हलप झालेली नाही, काही लोकं रील्स बघून टूर आयोजकांकडे तेथे जाण्याचा आग्रह धरतात तेव्हा तिथे जाण्याचं गाडीभाडं वाढतं , कारण काही किलोमीटर  वाढतात तसेच स्टे चे ऑपशन्स कमी असल्याने सध्या हॉटेल्स मध्ये सोय करावी लागते , पण पैसे साचेबध्द काश्मीर ट्युलिप फेस्टिवल स्पेशल सहलीपेक्षा जास्त येतो , म्हणजे खर्च वाढतो  !  त्यात रील्स पेक्षा प्रत्यक्षात ती ठिकाणं थोडी वेगळी असतात , रील  मध्ये ज्या ठिकाणी बर्फ दाखवला आहे त्या ठिकाणी बर्फ असेलच याची काही शास्वती नसते , दूधपाथ्री हि जागा बर्फ असताना अतिशय सुंदर दिसते पण बर्फ नसेल तर ते एक मोकळा मातीच मैदान आहे त्यामुळे दूधपाथ्री ला भेट द्यायची असेल तर फक्त जानेवारी ते एप्रिल मधेच  देणे योग्य राहते अन्यथा तिथे गेल्यनानंतर तो भाग फारसा आवडत नाही डोळ्यांना . याविषयी अधिक माहिती तुमच्या आवडीचे टूर आयोजक देऊ शकतात त्यांना तिथल्या ऋतूची पूर्ण कल्पना असते , अशा बोफबिट टूर करता किती खर्च येऊ शकतो याची खरी माहिती देखील त्यांना असते . त्याविषयी अधिक माहिती पुढच्या लेखात सांगेनच !




Comments

Popular posts from this blog

सांगा पाहू मी कोण? VSK बद्दल थोडे काही...